सकल मराठा समाजाशी सरकार सदैव चर्चेस तयार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाशी सरकार सदैव चर्चेस तयार असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून होणारी आंदोलने किंवा आत्महत्या ह्या सर्व बाबी अतिशय दुःखदायी आहेत. मेगाभरती संदर्भात मराठा समाजाच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबाबतीत चर्चा करून सर्वसामान्य उचित असा निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा व आंदोलनाचा अवलंब न करता शासनाशी चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1022076850787442688

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)