‘केरळ’ करदात्यांसाठी आयकर परताव्याच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली – केरळला भीषण महापूराचा फटका बसला असून तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. तसेच मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे देखील नुकसान झालं होतं. पुराचे पाणी आता अोसरू लागल्याने केरळमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. केंद्र सरकारने केरळमधील बिघडलेली परिस्थिती पाहता पूरग्रस्त केरळसाठी आयकर परताव्याच्या (इन्कम टॅक्स रिटर्न) मुदतीत वाढ केली आहे.

केरळशिवाय इतर राज्यात आयकर परतावा भरण्याची अखेरची तारीख ’31 आॅगस्ट’ आहे. मात्र केरळमधील पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पाहता फक्त ‘केरळ’ करदात्यांसाठी ही मुदत ’15 सप्टेंबर’ अशी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आयकर विभागाने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/FinMinIndia/status/1034434075338006528

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)