Ajit Pawar : राज्याच्या राजकारणातील प्रभावी राजकीय व्यक्तिमहत्वाने अकाली एक्सिटने सर्वांनाच धक्का दिला आहे. महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातात दुर्देवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. आज शासकीय सुट्टी दिली आहे. राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव होते. तळागळातील जनसामनांची जाण असलेला नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिले जात होते. आज ते आपल्यात नाहीत. यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. अजित पवार यांच्या अकाली निधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. माझ्यासाठी दमदार, दिलदार मित्र सोडून गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात आहे. मी, एकनाथ शिंदे लवकरच बारामतीकडे निघणार आहे. पंतप्रधान, गृहमंत्री यांना फोनवर घटनेची माहिती दिली आहे. त्यांनाही हा धक्का होता. त्यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केले. पुढच्या सर्व गोष्टी कुटुंबाची चर्चा करून ठरवण्यात येतील असं फडणवीसांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझं सुप्रिया सुळे, पार्थ पवारांशी बोलणे झाले. संपूर्ण कुटुंब बारामतीला पोहचल्यानंतर त्यांच्या संमतीने सगळे निर्णय घेतले जातील. आज शासकीय सुट्टी दिली आहे. राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येत आहे. पुढच्या सर्व बाबींची कल्पना लवकरच देण्यात येईल. या घटनेवर विश्वास ठेवायला मन तयार नाही असे देखील मुख्यमंत्री बोलताना म्हणाले. हेही वाचा : Ajit Pawar : शाळा आणि बाजारपेठा बंद.! अजित दादांच्या निधनानंतर महाराष्ट्रात लॉक डाऊन सारखी परिस्थिती, पुणे शहरात देखील शोककळा