मोदी सरकार महागाईवर चर्चा करण्यास घाबरते – प्रियांका गांधी

नवी दिल्ली – मोदी सरकार संसदेत महागाईवर चर्चा करण्यास घाबरत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे. त्यांना आंबा कसा खाता अशा स्वरूपाचे प्रश्‍न आवडतात; पण महागाईच्या विषयावर मात्र त्यांना चर्चा आवडत नाही.

महागाई हा लोकांशी संबंधित प्रश्‍न आहे त्यावर तरी सरकारने चर्चा घडवून आणायला हवी आहे असेही त्यांनी यानिमीत्ताने सूचित केले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकार थेट लोकांशी संबंधित प्रश्‍नावर चर्चा करण्यास तयार आहे असे म्हटले होते, पण विरोधकांकडून फार गंभीर नसलेल्या व अनावश्‍यक प्रश्‍नासाठीच आग्रह धरला जात आहे अशी टीकाही प्रल्हाद जोशी यांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर प्रियाकांनी महागाईच्या विषयावरून सरकारला हा टोमणा मारला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.