गोंदकर यांच्या निवडीने शिर्डीत जल्लोष

शिर्डी – भाजपच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची वर्णी लागली असून सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत भाजपच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले.

शिर्डी येथील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते राजेंद्र गोंदकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शहरात कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. गोंदकर यांच्या निवडीचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गोंदकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर साईमंदिरात जाऊन साईसमाधीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने शाल व उदी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, नितीन कोते, नगरसेवक सुजित गोंदकर, भाजपचे तालुका सरचिटणीस रवींद्र गोंदकर, सचिन शिंदे, अशोक पवार, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष किरण बोऱ्हाडे, गणेश जाधव, रमेश बिडये, सुनील लोढा, ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस स्वानंद रासने, रमेश कोते, राजेंद्र गोंदकर, रामहरी आहेर, अमोल कोते, लखन बेलदार, स्वप्निल गोंदकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाने दिलेली जबाबदारी सार्थ ठरवीत सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन येणाऱ्या सर्व निवडणुका ताकदीनिशी सर्वांना विश्‍वासात घेऊन लढणार, तसेच सर्व नेते व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन काम करणार असून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहे.

राजेंद्र गोंदकर, जिल्हाध्यक्ष, भाजप.  

Leave A Reply

Your email address will not be published.