मुंबई – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून यावेळी काँग्रेस तर्फे उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपतर्फे गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांना 223800 मते मिळाली आहेत. ऊर्मिला मातोंडकर यांच्या पारड्यात 77809 मतं मिळाली आहेत.