Google Storage Limit: गुगल ने आपल्या क्लाउड स्टोरेज पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. आतापर्यंत नवीन गुगल अकाउंट तयार करणाऱ्या प्रत्येक युजरला 15GB मोफत स्टोरेज मिळत होते. मात्र आता नवीन अकाउंट उघडल्यावर फक्त 5GB फ्री स्टोरेज मिळणार आहे. उर्वरित 15GB स्टोरेज मिळवण्यासाठी युजरला मोबाइल नंबर लिंक करून OTP द्वारे व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोजसाठी मिळणारे 15GB फ्री स्टोरेज हे युजर्ससाठी मोठे आकर्षण होते. सामान्य वापरकर्त्यांचे बहुतांश काम या स्टोरेजमध्ये सहज होत होते. पण आता कंपनीने नवीन नियम लागू करत फ्री स्टोरेज मर्यादेत बदल केला आहे. (Google Storage Limit) नवीन गुगल (Google) अकाउंट तयार करताना आता स्क्रीनवर 15GB ऐवजी फक्त 5GB फ्री स्टोरेज दिसत आहे. मात्र युजरने आपला मोबाइल नंबर अकाउंटशी जोडून OTP व्हेरिफिकेशन पूर्ण केले, तर पुन्हा 15GB स्टोरेज मिळू शकते. सध्या हा नियम फक्त नवीन अकाउंट्ससाठी लागू करण्यात आला आहे. जुन्या युजर्सना अद्याप पूर्वीप्रमाणे 15GB स्टोरेज मिळत राहणार आहे. (Google Storage Limit) Google Storage Limit: गुगलचा मोठा निर्णय! आता नवीन अकाउंटला फक्त 5GB स्टोरेज; 15GB साठी पूर्ण करावी लागणार नवी अट कंपनीने हा बदल का केला, यामागे दोन मोठी कारणे सांगितली जात आहेत. पहिले कारण म्हणजे वाढता खर्च. मेमरी आणि स्टोरेज हार्डवेअरची किंमत सातत्याने वाढत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोफत स्टोरेज देणे कंपनीसाठी खर्चिक ठरत आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे फेक अकाउंट्सवर नियंत्रण ठेवणे. अनेक लोक जास्त फ्री स्टोरेज मिळवण्यासाठी अनेक बनावट अकाउंट्स तयार करतात. त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात डेटा स्टोरेजचा भार सहन करावा लागतो. आता मोबाइल नंबर लिंक करणे आवश्यक केल्यामुळे एकाच व्यक्तीने अनेक अकाउंट्स तयार करण्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असे कंपनीला वाटते. मोबाइल नंबर लिंक करणे हे फक्त स्टोरेज वाढवण्यासाठीच उपयुक्त नाही, तर अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठीही महत्त्वाचे आहे. पासवर्ड विसरल्यास किंवा अकाउंट हॅक झाल्यास मोबाइल नंबरच्या मदतीने अकाउंट सहज रिकव्हर करता येते. (Google Storage Limit) मोबाइल नंबर लिंक करण्यासाठी सर्वप्रथम जीमेल, गुगल सर्च किंवा क्रोम अॅप उघडावे लागेल. त्यानंतर प्रोफाइल फोटोवर क्लिक करून “पर्सनल इन्फो” विभागात जावे. तिथे मोबाइल नंबरचा पर्याय दिसेल. नंबर टाकल्यानंतर OTP द्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागेल. गुगल च्या या निर्णयामुळे नवीन युजर्सना आता अतिरिक्त स्टोरेजसाठी मोबाइल नंबर जोडणे आवश्यक होणार आहे. त्यामुळे भविष्यात इतर टेक कंपन्याही अशाच प्रकारचे नियम लागू करू शकतात, अशी चर्चा तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू झाली आहे.