मुंबई- गुगल मॅपवर मुंबईतील कोरोना प्रतिबंधात्मक अर्थात कंटेन्मेंट झोनची परिसरांची अद्ययावत माहिती जाणून घेण्याची सोय आता युजर्सना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या सोयीमुळे आता सगळीकडे प्रवास सुरक्षित होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात अवतरली असून त्यामध्ये आणखी नावीण्य आणण्यात येईल. त्याचे महत्त्व पाहता जगातील इतर शहरांनीही आता त्याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, याआधी कंटेन्मेंट झोन पाहण्यासाठी किंवा कोरोनाबाधित आपल्यापासून किती लांब आहे, हे समजत होतं. त्यावरुन अनेक माहिती सुद्धा मिळत होती. आपल्या आरोग्याबाबत माहिती त्यात अॅपमध्ये लोड करावी लागत होती. त्यामुळे अनेकांना अनेक समस्या भेडसावत होत्या. मात्र दक्षता म्हणून ही अॅप अनेकांनी डाऊनलोड केलं होतं.