74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गूगलने बनवले आकर्षक डूडल !

आज सर्व भारतीय मोठ्या उत्साहात 74 वा स्वातंत्र दिवस साजरा करत आहेत. या दिनाचे औचित्य साधून सर्च इंजिन गूगल (Google) ने भारत देशाचे विविधतेने नटलेले एक उत्कृष्ट डूडल तयार केले आहे. गूगलच्या स्वातंत्र्य दिनाच्या डूडलमध्ये भारताची कला आणि संगीत दर्शविले गेले आहे. भारताच्या विविध भागात वापरली जाणाऱ्या मधुर संगीतवाद्यांचा यामध्ये समावेश आहे. सनई, तुतारी, ढोल, वीणा, बासरी  हि वाद्ये आपणास डूडल मध्ये पाहायला मिळतील.

स्वातंत्र्य दिनाच्या डूडलमध्ये (15 ऑगस्ट) गूगलने भारतीय संगीताची विविधता दर्शविली आहे. मुंबई येथील कलाकार सचिन घाणेकर यांनी हे डूडल डिझाइन केलेले आहे. गुगलने वाद्यांद्वारे भारतीय संगीताची झलक दाखविली आहे.

डूडलवर क्लिक केल्यावर भारत स्वातंत्र्य दिनाशी संबंधित मजकूर पाहायला मिळत आहे. गूगल स्वातंत्र्य दिनावर दरवर्षी अशाच प्रकारे डूडल बनवून स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यावर्षीचे हे आकर्षक गूगल डूडल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय संस्कृतीतील संगीत आणि पारंपरिक वाद्यांचे महत्व पटवून देणारे हे डूडल असून सर्व भारतीयांकडून या आर्ट चे भरभरून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.