गुगलने मतदानचा डुडलद्वारे दिला संदेश

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सरकारी आणि खासगी संस्थांकडून जनतेला विविध प्रकारे मतदानासाठी प्रेरित केले जात आहे. जाहिराती, स्ट्रीट प्ले, सेलिब्रिटींकडून आवाहन या मार्गे जनजागृती केली जाते. यातच गुगल या प्रसिद्ध सर्च इंजिन ने जगभरातील नामवंत व्यक्तींप्रती आपले स्नेह दर्शविण्यासाठी ‘गुगल डुडल’ हे अभियान चालू केले होते, याद्वारे गुगल, ‘डुडल’ अर्थात ऍनिमेटेड चित्रांद्वारे कृतज्ञता व्यक्त करीत असते. याच डुडलद्वारे   लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गुगलने खास ‘डुडल’ तयार केले असून यामध्ये बोटावर शाई लावल्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे. तसेच ट्विट करून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.

On your mark.
Get set.
Vote.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.