व्हिडीओ काॅलिंग चॅट अॅप गुगल ड्युओ संबंधी मागील महिन्यात एक बातमी आली होती की कंपनी लवकरच लिमिटमध्ये(क्षमता) बदल करणार आहे. त्यानुसार या व्हिडीओ काॅलिंग अॅप चॅटमध्ये आता 12 ऐवजी एकाचवेळी 32 लोकांसोबत व्हिडिओ काॅल करता येणार आहे.
यापूर्वी कंपनीने पहिले हे लिमिट 8 वरून 12 असे केले होते. पण लाॅकडाऊनमध्ये लोकांच्या सुविधेसाठी आणि अधिकाअधिक लोकांना यामध्ये कनेक्ट करण्यासाठी हे लिमिट 32 वर आणले आहे.
गुगल ड्युओ कंपनीचे सीनीयर डायरेक्टर प्रोडक्ट अॅण्ड डिजाइन सनाज अहारी लेमेलसन (Sanaz Ahari Lemelson) यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुगुल ड्युओ ही सुविधा क्रोमच्या लेटेस्ट व्हर्जनवरच उपलब्ध असेल. जर तुम्हाला 32 लोकांसोबत व्हिडीओ चॅट करायचं असेल तर तर तुम्हाला क्रोम चे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. तसेच ही सुविधा केवळ वेब व्हर्जनवरच उपलब्ध असेल हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
1/Today one of our most requested features for Duo, group calling on the web with up to 32 people, is starting to roll out on the latest version of Chrome. pic.twitter.com/hjnL96iVcz
— Sanaz (@sanazahari) June 16, 2020
जर तुम्हाला गुगल ड्युओ च्या नवीन सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर वेब व्हर्जनवर गुगल ड्युओ अॅप ओपन केल्यानंतर तिथे असलेल्या काॅनटॅक्ट लिस्टमध्ये ज्या लोकांशी संवाद(व्हिडीओ चॅट) साधायचा आहे त्यांना अॅड करावे लागेल. याव्दारे तुमच्यासह आणखी 31 जणांसह यामध्ये तुम्ही चॅट करू शकता. वर्क फार्म होम करणाऱ्यासाठी हे खूपच उपयोगी आहे.
लाॅकडाउन दरम्यान, गुगल ड्युओनेच नाही तर अनेक व्हिडीओ काॅलिंग अॅप्सने नवीन अपडेट आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.गुगल ड्युओने व्हिडीओ चॅटमध्ये लिमिट वाढविल्याने आता ते झूम आणि स्काॅयपी सारख्या अॅपला टक्कर देऊ शकतात.