मुंबई – फेसबुक वापरकर्त्यांचा लॉगइनचा तपशील काही प्रसिद्ध अॅप्स चोरत असल्यामुळे गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत गुगलने प्ले स्टोअरवरुन 25 अॅप्स हटवले आहेत. हे अॅप्स फेसबुक वरून युजर्सचा तपशील चोरत असल्याची माहिती समोर आल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले.
याबद्दल गुगलला एविना नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मने सतर्क केल्यानंतर यावर तात्काळ अंमलबजावणी करत गुगलने संबंधित अॅप्स प्ले स्टोरवरून हटवले आहे.
दरम्यान, तुम्ही सुद्धा खाली दिलेल्या यादीपैकी कोणतेही अॅप हाताळत असाल तर, ते तात्काळ फोन मधून डिलीट करा.
1. सुपर वॉलपेपर्स फ्लॅशलाइट्स
2. पेडेनटेफ
3. वॉलपेपर लेवल
4. कॉन्टूर लेवल वॉलपेपर
5. आयप्लेयर अँड आयवॉलपेपर
6. व्हिडियोमेकर
7. कलर वॉलपेपर्स
8. पेडोमीटर
9. पावरफुल फ्लॅशलाइट
10. सुपर ब्राइट फ्लॅशलाइट
11. सुपर फ्लॅशलाइट
12. सॉलिटायर गेम
13. एक्युरेट स्कॅनिंग ऑफ क्यूआर कोड
14. क्लासिक कार्ड गेम
15. जंक फाईल क्लीनिंग
16. सिंथेटिक झेड
17. फाइल मॅनेजर
18. कम्पोझिट झेड
19. स्क्रीनशॉट कॅप्चर
20. डेली होरोस्कोप वॉल पेपर्स
21. वॉक्सिया रीडर
22. प्लस वेदर
23. एनाइम लाईव्ह वॉलपेपर
24. आय हेल्थ स्टेप काऊंटर
25. कॉम टाइप फिक्शन