GoodNews : करोनाला संपवणारा ‘ड्रग मॉलिक्यूल’ सापडला; ‘टेक महिंद्रा’ करणार पेटंटसाठी दावा

नवी दिल्ली – देशात करोनाने थैमान घातलं आहे. सध्या देशात दुसरी लाट आली असून यापुढे आणखी किती लाटा येणार याची शाश्वती नाही. त्यातच दररोजची वाढती रुग्णसंख्या आणि मृतांचे आकडे यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र करोना व्हायरस संदर्भात एक गुड न्यूज आली आहे.

करोना प्रतिबंधक लस आता उपलब्ध झाली आहे. मात्र लस घेतल्यानंतर करोना झाला तरी करोनाला नष्ट करणारं औषध लवकरच येणार आहे. टेक महिंद्रा या कंपनीने ‘रिगेन बायोसायन्स’ या औषध निर्मात्या कंपनीसोबत मिळून एक ड्रग मॉलिक्यूल शोधला आहे. हा ड्रग मॉलिक्यूल करोना व्हायरसला मारून टाकतो, असा दावाही करण्यात आला आहे. या औषधाच्या पेटंटसाठी टेक महिंद्रा दावा दाखल करणार असल्याचं समजतं.

या संदर्भात टेक महिंद्राच्या मेकर्स लॅब याचे ग्लोबल हेड निखील मल्होत्रा यांनी सांगितलं की,  “आम्ही आणि पार्टनर संशोधक रीगेनने 8 हजार मॉलिक्यूलचा अभ्यास करून असा मॉलिक्यूल शोधला आहे, ज्यात करोना व्हायरसला संपवण्याची ताकद आहे. आम्ही पेटंटसाठी अर्ज केल्याशिवाय या औषधाचं नाव जाहीर करू शकत नसल्याचं ते म्हणाले. मेकर्स लॅब ही टेक महिंद्राची रिसर्च विंग आहे. मल्होत्रा त्याचे प्रमुख असून मॉलिक्यूल संदर्भातील संशोधन बंगळुरू येथे सुरू आहे.

दरम्यान या औषधाच्या आणखी काही चाचण्या बाकी आहे. या औषधांचा प्रभाव तापसण्याच्या चाचण्यांसाठीच आम्ही पेटंटसाठी प्रयत्नशील असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.