चांगल्या विचारांची गुढी नगरमध्ये मोठे बदल घडवेल

नरेंद्र फिरोदिया ः विशाल गणपती मंदिरात आय लव्ह नगर ऍपचा प्रारंभ 

नगर –
चांगल्या बदलांची सुरूवात स्वत:पासून करावी अशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शिकवण आहे. नगर शहराच्या सकारात्मक बदलाची नांदी ठरणाऱ्या डिजीटल पर्वाचा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ होत आहे. आय लव्ह नगर या ऍपची हि गुढी येणाऱ्या काळात प्रत्येक नगरकराच्या मोबाईलवर असेल. यातील प्रत्येक गोष्ट नगरकरांना नवा विचार देईलच. याशिवाय नगरकरांना शहराप्रती त्यांच्या मनात असलेले प्रेम व्यक्त करण्याची संधी देईल. आपल्या शहरात सर्वजण मिळून कोणत्या चांगल्या गोष्टी करू शकतो, याचा कृतीयुक्त विचार देईल, असे प्रतिपादन आय लव्ह नगर या ऍपचे संकल्पक तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

नगर शहरावर प्रेम असलेल्या प्रत्येकालाच अभिमान वाटेल, शहराप्रती असलेली आत्मियता अधिक वृद्धींगत करेल, त्यांना व्यक्त होण्यासाठी, चांगल्या उपक्रमांत सहभागी होण्याची संधी देणारे व सर्वांनाच उत्सुकता लागलेले आय लव्ह नगर ऍप गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वांसाठी खुले झाले आहे. नगरचे ग्रामदैवत माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिरात या ऍपचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. यावेळी नरेंद्र फिरोदिया बोलत होते. याप्रसंगी मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज, विश्‍वस्त अशोक कानडे, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या आशाताई फिरोदिया, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, ललिताताई फिरोदिया, रिंकू फिरोदिया, गौरव फिरोदिया, कल्याणी फिरोदिया, मेहेरप्रकाश तिवारी, अमित बुरा, अक्षय मुनोत आदी उपस्थित होते.

विशाल गणपतीची आरती व पूजा करून आय लव्ह नगर ऍपचा अतिशय उत्साहात प्रारंभ करण्यात आला. स्मार्ट फोनवरील आयओएस किंवा गुगल प्ले स्टोअरमधून प्रत्येक जण आय लव्ह नगर ऍप डावूनलोड करता येईल. आय लव्ह नगर ऍप दोन वर्षांच्या अभ्यासाअंती सर्व बारीक सारीक गोष्टींचा विचार करून साकारण्यात आला आहे. डिजीटल भारत अभियानांतर्गत सर्व नगरकरांना एकमेकांशी जोडण्याबरोबरच त्यांना व्यक्त होण्याचे हक्काचे व्यासपीठ ऍपव्दारे उपलब्ध झाले आहे. तत्पूर्वी आय लव्ह नगरच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून शहरात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा विषयक राबविण्यात येत आहेत. यातून व्यापक जनजागृती होण्यास मदत झाली आहे. आता ऍपच्या माध्यमातून एक प्रकारची चांगल्या विचारांची लोकचळवळ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यात नगरकर आपल्या प्रभागातील अडअडचणी, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी थेट दाद मागू शकतो. प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून ऍप कार्यरत असणार आहे. याशिवाय आजूबाजूला घडणार्या विविध घटना, इव्हेंट याची समग्र व विश्‍वासार्ह माहितीही ऍपव्दारे सर्वांपर्यंत पोहचवली जाणार आहे. नगरची खाद्यसंस्कृती, वैशिष्ट्‌‌‌‌‌‌‌‌‌यपूर्ण खाद्यपदार्थ, महत्त्वाचे दूरध्वनी क्‍र्रमांक, पत्ते, आरोग्य विषयक सेवा याचीही इत्यंभूत माहिती यात आहे. याशिवाय नगरचे भूषण असलेला ऐतिहासिक वारसा, पर्यटनस्थळे ऍपच्या माध्यमातून जगासमोर आले आहेत.

आगामी काळात स्वच्छतेचे विशेष महत्त्व ओळखून स्वच्छ अहमदनगर या संकल्पनेतून, अहमदनगर शहराला सर्वोत्तम स्वच्छ शहर बनविण्याचे ध्येय मनाशी बाळगून आय लव्ह नगरव्दारे एक नवी लोकचळवळ उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत. त्याबरोबरच विचारपीठ या संकल्पनेतून अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्याया व्यक्तीमत्त्वाच्या सूचनांना प्राधान्य देवून, नवनवीन गोष्टींचा समावेश करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.