मुंबई – भारतात आयपीओच्या ( IPO ) माध्यमातून भांडवल उभारणीसाठी कंपन्या करीत असलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मिसेस बेक्टर्स फूड ( Mrs. Bectors Food ) स्पेशियालिटीज कंपनीचा आयपीओ मंगळवारी सकाळी खुला झाल्यानंतर पहिल्या काही तासातच उपलब्ध शेअरच्या 1.57 टक्के मागणी गुंतवणूकदारांकडून नोंदविण्यात आली.
कंपनीडून शेअरची किंमत 286 ते 288 रुपये अशी ठरविण्यात आली असून याद्वारे कंपनी 540 कोटी रुपये उभे करणार आहे. अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीला मंगळवारी 162 कोटी रुपये मिळाले.
बर्गर किंगची आगेकूच…
सोमवारी शेअर बाजारात नोंदणी झालेल्या बर्गर किंगच्या शेअरच्या भावात मंगळवारी आणखी वाढ झाली. 60 रुपयाच्या शेअरचा भाव काल 138 रुपये झाला होता.
दरम्यान, आज बाजार बंद होताना या शेअरचा भाव 166 रुपयांवर गेला. त्यामुळे हा आयपीओ खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांचा चांगलाच फायदा झाला आहे.