Video | महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला वाघोलीत चांगला प्रतिसाद 

वाघोली येथे केंद्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध

वाघोली (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला वाघोलीत चांगला प्रतिसाद  मिळाला. महाविकास आघाडी व राष्ट्रीय जनहित परिषद यांच्या वतीने शिवाजी पुतळा चौक ते केसनंद फाटापर्यंत शांतता निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. केंद्रातील  भाजप विरोधात निषेध व  घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी  शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष व इतर आजी-माजी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.