कोल्हापूर /प्रतिनिधी – कोरोणा प्रतिबंधक लस कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. येत्या शनिवारपासून जिल्ह्यातील 14 केंद्रांवर ही लस नोंदणी केलेल्याना दिली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे सुमारे 37 हजार 580 डोस प्राप्त झाले असून त्याचे वितरण उद्यापासून जिल्ह्यातील 12 आरोग्य केंद्रावर केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे.
शनिवारपासून ही लस देण्यात येणार असू जिल्ह्यात दररोज सुमारे एक हजार व्यक्तींना ही लस दिली जाणार असल्याचं जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी सांगितलं आहे.