GOOD NEWS : लसीकरणाला वेग येणार; रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप भारतात दाखल

हैदराबाद – देशात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यासंदर्भात पावले उचलली होती. देशात लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर परदेशी लसींना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी रशियाच्या स्पूटनिक व्ही या लसीची दुसरी खेप भारतात आज दाखल झाली आहे.

स्पुटनिक व्ही लसीची दुसरी खेप हैदराबादमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी पहिली खेप १ मे रोजी भारतात पोहोचली होती. १३ एप्रिलला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) स्पुटनिक व्ही लसीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. माहितीनुसार देशात लवकरच रशियाच्या एक डोसच्या ‘स्पुटनिक लाईट’ लसीला देखील मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान जुलैपासून स्पुटनिक लसीचे उत्पादन देशात सुरू होईल. रशियाच्या गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर आणि रशियन डायरेक्ट इनव्हेट्मेंट फंड यांच्याकडून ‘स्पुटनिक-व्ही’ लस विकसित करण्यात आली. सध्या देशाच्या लसीकरण मोहिमेमध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसीचा वापर केला जात आहे.

स्पूटनिक व्ही लस करोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या लसीची किंमत ९४८ रुपये असून ५ टक्के जीएसटी प्रति डोसच्या एमआरपीवर आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.