अभिनेत्री प्रीती झिंटा ही पती जीन गुडइनफसमवेत लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली आहे. पण, सध्या ती भारतात आहे. नुकतीच मंगळवारी प्रीती अभिनेता हृतिक रोशनच्या घरी आली होती. हृतिकच्या घरातून बाहेर पडताना दोघांनाही स्पॉट केले गेले होते. यावेळी प्रीतीचा हा ड्रेस पाहून सोशल मीडियावर तिच्या प्रेगनन्सीची चर्चा रंगली आहे.
वास्तविक, अभिनेत्री अनुष्का शर्माने जेव्हा “गुड न्यूज’ची घोषणा केली, तेव्हा असाच पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. त्याचवेळी हार्दिक पांड्याची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकनेही गरोदरपणात पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. करिना कपूर-खानदेखील अशाच ड्रेसमध्ये दिसली होती. यानंतर या ड्रेसबद्दल बऱ्याच मीम्स बनवल्या गेल्या. आता प्रीतीचा हा ड्रेस पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर कमेंट करत विचारत आहेत की, प्रीती लवकरच गुडन्यूज देणार आहेस का? तर, कोणी म्हणतंय की, हा “गुड न्यूज’वाला ड्रेस आहे!
दरम्यान, प्रीती आणि हृतिक आगामी सीरिजची निर्मिती करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, “द नाईट मॅनेजर’ या कादंबरीवर आधारित सीरिज तयार केली जात आहे. कथेचे पात्र खूपच गुंतागुंतीचे होते. ज्यामुळे तिने हृतिकला याची विचारणा केली. हृतिकनेही या भूमिकेसाठी त्वरित सहमती दर्शविली. “नाईट मॅनेजर’ हा हृतिकचा ओटीटीवरील पहिला प्रोजेक्ट असेल आणि यासह प्रीतीदेखील पहिल्यांदाच ओटीटीवर सीरिज तयार करेल.