अमृता रावनेही आपल्याकडे “गुडन्यूज’ असल्याचे संकेत दिले आहे. अमृता रावला आपल्या फॅन्सला सरप्राईज दिल आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अमृता-अनमोलने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रविवारी सकाळी अमृताने मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
तिने आरजे अनमोलबरोबर लग्न केले होते, तेंव्हाही या लग्नाची घोषणा तिने अशीच अचानक केली होती. अनमोलने 2009 मध्ये अमृताचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यानंतर त्यांच्यातील लव्हस्टोरी सुरू झाली होती आणि 2016 मध्ये दोघांनी लग्न केले होते. आता अनमोल आणि अमृताच्या घरी एक छोटा पाहुणा लवकरच येणार असल्याची माहिती मिळते आहे.
अमृताने हा अनुभव आपल्यासाठी खूपच आनंददायक असल्याचे तिच्या जवळच्या नातेवाईकांना सांगितले आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच अमृताला या गुडन्यूजचे संकेत मिळाले होते.