खुशखबर ! आता घरीच मिळणार लस; ‘डोअर टू डोअर’ लसीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’

नवी दिल्ली – आतापर्यंत करोना लस घेण्यासाठी करोना लसीकरण केंद्रावर जावे लागत होते. पण आता घरच्या घरीच लस घेता येणार असून केंद्र सरकारने “डोअर टू डोअर’ लसीकरण मोहिमेला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या मोहिमेचा लाभ दिव्यांग, वयस्कर किंवा आजारी असलेल्या नागरिकांना मिळणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशात करोना लसीकरण मोहीम मोठया प्रमाणात राबविण्यात येत आहे. पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलताही येत नसल्याने अनेक ज्येष्ठ, दिव्यांग आणि आजारी असलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचणे शक्‍य होत नाही. अशा नागरिकांसाठी याआधी सरकारने जवळच लसीकरण केंद्र उपलब्ध करून दिले होते. पण अद्यापही काही लोकांना तिथपर्यंतही जाता येत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.

यामुळे सरकारने आता दिव्यांग, वयस्कर व्यक्ती ज्यांना बिलकुल हालचाल करता येत नाही, आजारपणामुळे अंथरूणाला खिळलेले रुग्ण अशा सर्वांसाठी घरीच करोना लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी गाइडलाइन्सही जारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आतापर्यंत 83 कोटींहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. यात 66% प्रौढ नागरिकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे, तर 23 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.