गुडन्यूज : भारतातील ‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

नवी दिल्ली – करोनाचा कहर जगभर सुरु असताना काही आनंदाच्या बातम्या देखील समोर येत आहे. जगभरातील औषध कंपन्या करोना विरोधात लस शोधत आहेत. यातील काही कंपन्या यशाच्या जवळ आहेत. भारतातील ‘भारत बायोटेक’ या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ ही लस तयार केली आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे.

भारताचे सिरम इन्स्टिट्यूट, झायड्स कैडिला आणि भारत बायोटेक करोना लसीवर काम करत आहेत. यातील एक लस अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन तिसऱ्या टप्प्यामध्ये पोहचली आहे. या लसीची अंतिम टप्प्यातील चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यास सामान्य नागरिकांना ती उपलब्ध होणार आहे. कंपनी अजून एका करोना लसीवर काम करत आहे. ही लसी नाकावाटे दिल्या जाणाऱ्या ड्रॉप स्वरुपात असेल. पुढच्या वर्षापर्यंत ही लस होईल.

दरम्यान, भारत बायोटेकची कोवॅक्‍सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलोजी (एनआयव्ही) सोबत मिळून तयार करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.