खुशखबर ! एक जूनला मान्सून केरळात दाखल होणार

पुणे (प्रतिनिधी)- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे आपल्या नियोजित वेळेनुसार म्हणजे एक जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.दरम्यान मान्सून आज अरबी समुद्रात दाखल झाला असून त्याने मालदिवस व कोमोरीन बेटांचा काही भाग व्यापला आहे.

यंदा मान्सून केरळात नियोजित वेळेपेक्षा चार दिवस उशीरा दाखल होईल असा अंदाज यापुर्वी हवामान खात्याने वर्तविला होता परंतू बुधवार पासून बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर घडलेल्या घडामोडीमुळे मान्सूनच्या वाटचालीला चालना मिळाली आणि बुधवारी मान्सूनने अंदमानाचा संपुर्ण भाग व्यापला तर गुरूवारी ता अरबी समुद्रात दाखल झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे.या प्रणालीमुळे मान्सूनचे वारे खेचून आणण्यास पोषक स्थिती तयार होत असल्याने मान्सून एक जूर रोजी केरळात दाखल होणार असल्याचे संकेत आहे. त्याचबरोबर या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची सुद्धा दाट शक्‍यता आहे. हे वादळ निर्माण झाल्यास कोकण-गोव्या सह मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.