Good News : रशियाची स्पूटनिक लस भारतात दाखल, लसीकरण मोहिमेला वेग येणार

नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांचा दैनंदिन आकडा तीन हजारांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम वेगवान करण्यात येत आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामुळे या महिमेला ब्रेक लागतं की काय, अशी स्थिती होती. मात्र रशियाची बहुचर्चित स्पूटनिक व्ही लस भारतात दाखल झाली आहे.

सरकारनं स्पुटनिक व्ही या रशियन लसीला परवानगी दिल्यानंतर शनिवारी दुपारी भारतात या लशींची पहिले खेप पोहोचली आहे. शनिवारी दुपारी हैदराबादेत स्पूटनिक व्ही लसींचे डोस घेऊन आलेलं विमान दाखल झालं. त्यामुळं भारतातल्या लसीकरण मोहिमेला अधिक बळ मिळणार आहे.

केंद्र सरकारने 1 मे पासून देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. मात्र लसींच्या तुटवड्यामुळं संपूर्ण देशभरात अपेक्षित वेगानं ही लसीकरण मोहीम सुरू झाली नाही. अनेक राज्यांमध्ये तर 45 वर्षांपुढील वयोगटाच्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठीही लसीचे डोस उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळालं होतं. आता रशियन लस आल्याने लसीकरण मोहीम वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.