पुण्यातील कोरोनाचे पाहिले पाचही रुग्ण ठणठणीत बरे
पुणे : कोरोनाची बाधा झालेले पुण्यातील पाहिले पाचही रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यातील 2 रुग्णांना घरी सोडण्यात येणार असून उद्या ( गुरुवारी) आणखी 3 रुग्ण घरी पाठविले जाणार असल्याची माहीती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. पुण्यासाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.
तर , कोरोनाच्या साथीला अटकाव घालण्यासाठी आणि त्यांच्या वैद्यकीय उपचारसाठी धडपडणाऱ्या वैद्यकीय सेवकासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. तर आणखी एक आनंदाची बाब म्हणजे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेली अतिदक्षता विभागातील अंगणवाडी सेविकेची प्रकृतीही सुधारत असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.