कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी खुशखबर आहे. जवळपास 2 महिन्यापासून मटणापासून दूर राहवे लागलेल्या कोल्हापूरकरांच्या ताटात आजपासून मटण येणार आहे.
मटनावरून सुरू असणारा वाद अखेर आज शांत झालाय. मटण विक्रेते आणि कृती समितीने आजपासून ५२० रुपये प्रति किलो दराने उत्तम प्रतीच्या मटणाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापुरात मटणाच्या दरावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, या वादावर तोडगा निघाल्याने सर्वसामान्य ग्राहक, विक्रेते आणि हॉटेल व्यवसायिक यांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापुरात मटण दरवाढ झाल्यानंतर मटण दरवाढविरोधी कृती समितीन प्रति किलो ४८० रुपये दराने मटणाची विक्री व्हावी असा आग्रह धरला होता. मात्र हा दर परवडत नसल्याचे सांगत मटण विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवली होती. यावर तोडगा निघणे अवघड होऊन बसले होते.
या वादात कोल्हापूरकरांचा थर्टीफर्स्टही कोरडाच गेला. अखेर काल झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला असून मटण 520 रुपये प्रति किलो दराने मिळायला सुरुवात झालीय. मटणविक्री बंद असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी फक्त चिकन देणे सुरू केले होते.