बॉलवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी चर्चेत येण्यामागचे कारण थोडे वेगळे आहे. कारण जोनास कुटुंबामध्ये लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. निक जोनासचा मोठा भाऊ जो जोनास आणि त्याची पत्नी सोफी टर्नर हे आई-वडील होणार आहेत. त्यामुळे प्रियांका आणि निकही लवकरच काका-काकू होणार आहेत.
सोफी टर्नर 4 महिन्यांची प्रेग्नंट आहे. आपण आई होणार या बातमीने सोफी खूप खूश झाली आहे. याशिवाय जो देखील तितकाच आनंदी आहे. ही बातमी दोघांनी आपल्या कुटुंबीयांनी सांगितली आहे. त्यामुळे जोनास कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.
जो जोनास आणि सोफी टर्नर यांनी मे 2019 मध्ये लास वेगास येथे लग्न केले होते. त्यानंतर जो आणि सोफी ग्रॅमी अवॉर्ड शो 2020 मध्ये एकत्र दिसले होते. या कार्यक्रमात जो याने निक आणि केविनच्या मदतीने आपले नवे गाणे थहरीं अ चरप ीीेंर ऊे या गाण्याचे सादरीकरण केले होते. या कार्यक्रमास प्रियांका चोप्राही उपस्थित होती.
प्रियांकाचा पती निक जोनास आणि त्याचे भाऊ जो जोनास आणि केविन जोनास नेहमीच चर्चेत राहतात. म्यूझिक बॅंड जोनास ब्रदर्स नावाच्या कंपनीत ते एकत्र काम करतात. जोनर्स ब्रदर्सची सध्या हॅपीनेस बिगिन्स टूर सुरू आहे. या म्यूझिक टूरमार्फत ते युरोपात विविध कार्यक्रमात व्यस्त आहेत.