गुड न्यूज ! 24 तासांत करोनाने पुण्यात एकही मृत्यू नाही

पुणे – शहरात गेल्या 24 तासांत 180 करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून, 265 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, गेल्या 24 तासांत करोनाने एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. त्यामुळे करोनाशी झुंज देणाऱ्या पुणेकरांच्या दृष्टीने ही गुड न्यूज ठरली आहे.

शनिवारच्या प्राप्त आकडेवारीनंतर शहरात करोनाच्या बाधितांची एकूण संख्या आता 1 लाख 92 हजार 982 वर पोहचली आहे. त्यातील 1 लाख 86 हजार 801 जण करोनामुक्‍त झाले आहेत.

बाधितांमधील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या 1 हजार 407 असून, त्यातील 112 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. शहरात आतापर्यंत एकूण 4, 774 जणांचा मृत्यु झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी 3,239 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली असून, एकूण 10 लाख 47 हजार 661 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.