पुणे : राज्य सरकारच्या निर्णयानुसार काही दिवसापूर्वी शासकीय कार्यालयांना पाच दिवसाचा आठवडा जाहीर करण्यात आला. मात्र, उद्या शनिवारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरु राहणार असल्याचे, आरटीओ प्रशासनाने सांगितले आहे.
राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु होणार आहे. मात्र, आरटीओ कार्यालयात काही नागरिकांनी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी, पक्की अनुज्ञप्ती चाचणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण आदी कामकाज ऑनलाईन काढण्यासाठी मागील काही दिवसापूर्वी नोंदणी करत शनिवारची अपॉइंटमेंट घेतली आहे. त्यामुळे, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आज कार्यालय सुरु राहणार आहेत. मात्र, पुढील आठवड्यातील शनिवारी कार्यालय सुरु राहणार का नाही, याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे, आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.