Indian Railway – रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना आता युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ घेता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या तब्बल १ लाख ३६ हजार ७८० कर्माचऱ्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.
नुकतीच केंद्र सरकारने या युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजूरी दिली आहे. इतर राज्यांना देखील या योजनेचा अवलंब करून आपापल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेद्वारे पेन्शन देता येणार आहे. ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस म्हणजेच नवी पेन्शन योजना सुरू आहे.
मात्र ती योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरलेली असताना केंद्र सरकारने आता यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजूरी दिली आहे. निवृत्ती पूर्वीच्या वेतनाची ५० टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे. तर या योजनेनुसार, २५ वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ मिळणार आहे.