पुणे – शिवाजीनगर ते स्वारगेट या स्थानकाच्या दरम्यानच्या भुयारी मार्गाच्या बोगद्यांचे काम सुरू आहे. मुठा आणि मुळा या दोन “टनेल बोअरिंग मशीन’ कृषी महाविद्यालयाकडून स्वारगेटच्या दिशेने येत आहेत. यापैकी शनिवारी “मुळा’ हे मशिन बुधवार पेठ स्थानकात पोहोचले असून, त्याद्वारे “ब्रेक थ्रू’ साधण्यात आला. मशीन नियोजित स्थानकात पोहचताच कर्मचाऱ्यांनी फटाके फोडत एकच जल्लोष केला. यावेळी “भारत माता की जय’ अशी घोषणा देत आनंद व्यक्त करण्यात आला.
मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेत शिवाजीनगर ते स्वारगेट या स्थानकादरम्यान भुयारी मार्ग नियोजित आहे. हा मार्ग एकूण 6 किलोमीटरचा असून, ये-जा करण्यासाठी स्वतंत्र 2 बोगदे आहेत. भुयारी मार्गाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी तीन महाकाय टनेल बोअरिंग मशिनचा वापर करण्यात येत आहे.
यापैकी “मुठा’ आणि “मुळा’ ही दोन टनेल बोअरिंग मशीन कृषी महाविद्यालय येथून स्वारगेटच्या दिशेने मार्ग तयार करत आहेत. तर तिसरे “पवना’ हे मशीन स्वारगेटकडून बुधवार पेठ स्थानकाकडे मार्गाक्रमण करत आहेत. कृषी महाविद्यालय येथून “मुठा’ या मशीनने 29 नोव्हेंबर रोजी टनेल बनविण्यास सुरुवात केली.
शिवाजीनगर मेट्रो स्थानक, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकापर्यंत मार्ग केल्यानंतर नदीखालून बोगदा बनवत मुठा टनेल बोअरिंग मशीन 22 जुलै रोजी बुधवार पेठ (फडके हौद) या स्थानकात पोहोचले. तर 30 नोव्हेंबर रोजी निघालेले मुळा टनेल बोअरिंग मशीन शनिवारी (31 जुलै) बुधवार पेठ स्थानकात पोहोचले असून, “ब्रेक थ्रू’ साधला जात आहे.
शिवाजीनगर हे मेट्रोचे पहिले भुयारी स्थानक 474 मीटर दूर आहे. त्यानंतर सिव्हिल कोर्ट स्थानक 777 मीटर अंतरावर आहे. सिव्हिल कोर्ट स्थानकानंतर मुठा नदीखालून भुयारी मार्गाचे बुधवार पेठ (फडके हौद) स्थानकापर्यंतचे अंतर 704 मीटर आहे. बुधवार पेठ ते मंडई या स्थानकांचे अंतर 849 मीटर आहे. मंडई ते स्वारगेट या अंतिम टप्प्याचे अंतर 1 हजार 180 मीटर सून, एकूण भुयारी मार्गाची लांबी 6 किलोमीटर आहे.
“टनेल बोअरिंग मशीन’ बुधवार पेठ स्थानकात पोहोचले
पुणे :पुणे मेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट या स्थानकादरम्यानचा मार्ग भुयारी आहे.या भुयारी मार्गाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी तीन टनेल बोअरिंग मशीनचा वापर करण्यात येत असून मुठा व मुळा ही नावे दिलेली ही मशीन कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या मार्गातील दुसऱ्या मुळा टनेल मशीनने बुधवार पेठ स्थानकात शनिवारी ब्रेक थ्रु साधला यावेळी मेट्रोचे अधिकारी कर्मचारी तसेच आसपासच्या इमारतीमधील नागरिकांनी जल्लोष केला.