पुणे – दिवाळीच्या सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतंच पुणे महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये पुणेकरांना दिवाळीची खरेदी रात्री 11 पर्यंत करता येईल. तसेच रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे. महापालिकेच्या या महत्वपूर्ण या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याशिवाय, 22 ऑक्टोबर पासून अँम्युझमेंट पार्क आणि संग्रहालय सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका पुण्याला देखील बसला होता. पुण्यामध्ये करोना आणि म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढली होती.