‘या’ १२ देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी खुशखबर; विशेष विमानाने होणार ‘देश’वापसी

नवी दिल्ली – देशव्यापी लॉक डाऊनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा खंडित करण्यात आली असून यामुळे अनेक भारतीय नागरिक प्रदेशात अडकून पडले आहेत. या  परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना आज केंद्र सरकारने चांगलाच दिलासा दिला आहे. जगभरातील १२ देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आता परत मायदेशी आणण्यात येणार असून यासाठी येत्या ७ मेपासून १४ मेपर्यंत विमानांच्या ६४ फेऱ्या होणार आहेत. याबाबतची माहिती भारताचे नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पुरी यांनी ज्या १२ देशांमधून भारतीयांना परत आणले जाणार आहे त्यांची यादी देखील जाहीर केली असून यामध्ये युएई, कतार, सौदी अरेबिया, यूके, सिंगापूर, युनायटेड स्टेट्स, फिलीपिन्स, बांगलादेश, बहरेन, मलेशिया, कुवेत आणि ओमान  या देशांचा समावेश आहे.

देशनिहाय विमान उड्डणांची संख्या

 • युएई- 10
 • कतार- 2,
 • सौदी अरेबिया- 5,
 • यूके- 7,
 • सिंगापूर- 5,
 • युनायटेड स्टेट्स -7,
 • फिलीपिन्स- 5,
 • बांगलादेश- 7,
 • बहरैन – 2,
 • मलेशिया -7,
 • कुवैत -5,
 • ओमान -2

 

Leave A Reply

Your email address will not be published.