पुणे: शहरातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठीचा ऑनलाईन परवाने घ्यावेत यासाठी परवाना अर्ज करण्याची मुदत 20 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. या शिवाय, शेवटच्या पाच दिवसात महापालिका ऑफलाईन अर्जही स्वीकारणार आहे.
न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, पालिकेकडून या वर्षी 20 जुलै पासून ऑनलाईन परवाने देण्यात येत आहेत. मात्र, शहरात जवळापास तीन हजारच्या मंडळे असताना अवघे 1372 अर्ज आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मंडळांना परवाने घेणे सुलभ व्हावे म्हणून ही मुदत वाढविण्यात आली आहे. तसेच मंडळाकडूनही परवाने ऑनलाईन तसेच ऑफलाईन परवाना अर्ज स्वीकारण्याची मागणी करण्यात येत होती.