Aditi Tatkare : लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स अकाऊंटवरून ट्वीट करत माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असेही अदिती तटकरे म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व… — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 27, 2026 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यावर १५०० रुपये जमा केले जातात. महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना चालवली जाते. जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे २३ फेब्रुवारीला देण्यात आले होते. त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष फेब्रुवारीचा हफ्ता कधी येणार याकडे लागले होते. अखेर आजपासून या हप्त्याचे १५०० रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. हेही वाचा : Body Odour: “घामाच्या दुर्गंधीला करा रामराम; डिओशिवायही मिळवा फ्रेशनेस!”