नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या एका चायनीज स्टार्ट-अपने एका भन्नाट किसिंग मशीनचा शोध लावला आहे. होय, हे आहे चक्क चुंबन मशीन. या मशिनची खासियत म्हणजे याच्या सहाय्याने चुंबनाचा फील जसा आहे तसाच येणार आहे. मोबाईलच्या मदतीने हे उपकरण वापरता येणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सिलिकॉन लिप्स आणि मोशन सेन्सरच्या मदतीने किस डेटा पाठवला जातो.
* मशिन आवाजही कॅप्चर करते
चीनच्या Siweifushe नावाच्या स्टार्टअपने हे मशीन बनवले आहे. किसच्या आवाज ‘मुआ’ (Mua) वरून प्रेरित या मशीनला MUA असे नाव देण्यात आले आहे. या मशीनची खास गोष्ट म्हणजे हे चुंबन घेताना आवाज काढते आणि हे मशीन वास्तविक चुंबनासारखे वाटण्यासाठी तापमान इत्यादी नियंत्रित करते.
मुआ सेन्सर आणि मोशनच्या आधारावर काम करते. वास्तविक, जेव्हा पार्टनर मशीनचे चुंबन घेतो तेव्हा सेन्सर तो डेटा दुसर्या मशीनला पास करतात आणि तेथे मशीन पहिल्या मशीनमध्ये एखाद्या व्यक्तीप्रमाणेच प्रतिक्रिया देते आणि तसे वाटते.
* कल्पना कशी आली ?
मुआ बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव झाओ जी इयानबो (झाओ जियानबो) आहे. वास्तविक, कोरोना लॉकडाऊनमध्ये झाओ आपल्या मैत्रिणीला भेटू शकला नाही आणि तिला खूप मिस करत होता. म्हणजेच कोरोनामध्ये आपल्या मैत्रिणीला बराच काळ भेटता न आल्याने झाओने हे मशीन बनवले. आणि या मशिनलाही मुआ असे नाव देण्यात आले.
* चुंबन मशीनची किंमत
लोकांना किसिंग मशीन खूप आवडते. या मशीनच्या किंमतीबद्दल बोलायचे तर त्याची किंमत 260 चीनी युआन म्हणजेच जवळपास 3000 रुपये आहे. अवघ्या दोन आठवड्यांत 3000 किसिंग मशीनची विक्री झाली असून 20 हजारांहून अधिक ऑर्डर्स मिळाल्या आहेत.