केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता वाढवल्याचे सरकारकडून आदेश जारी; ‘या’ तारखेपासून मिळणार भत्ता

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून खुशखबर देण्यात आली आहे. महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने १ जुलैपासून भत्ता जारी करण्याबाबत आदेश जारी केला आहे. १ जुलैपासून महागाई भत्ता वाढवून २८ टक्के करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश  जारी करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जुलैपासून ११ टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकारकडून निवेदन जारी करुन सांगण्यात आले की, १ जुलै २०२१ पासून महागाई भत्ता वाढवून २८ टक्के होईल.

जो सध्याच्या १७ टक्क्यांवरुन ११ टक्के अधिक आहे. पण, १ जानेवारी २०२० पासून ते ३० जून २०२१ पर्यंतच्या कालावधीसाठी तो १७ टक्केच राहील.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.