बारामती – शहरातील पॉझिटिव्ह करोना रुग्णाच्या संपर्कातील त्याच्या नातेवाईकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना घरी पाठवण्यात आले असले तरी 14 दिवस त्यांना होम क्वारंटाइन करून ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही बारामतीकरांनी घरातच बसून प्रशासनास साह्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.