Khel Khel Mein OTT Release | बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचे मागील काही चित्रपट सलग फ्लॉप ठरले आहेत. ज्यामध्ये ‘खेल खेल में’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे. बिग बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे.
‘खेल खेल में’ OTT प्लॅटफॉर्म Netflix 9 ऑक्टोबरला रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे. हा 2016 च्या इटालियन चित्रपट परफेक्ट स्ट्रेंजर्स’ चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत फरदीन खान, वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एवढी मोठी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट हिट होऊ शकला नाही. Khel Khel Mein OTT Release |
चित्रपटात जेव्हा पार्टीमध्ये सगळे मित्र-मैत्रिण एकत्र येतात तेव्हा ते एक गेम खेळण्याचं ठरवतात. मोबाईल फोन अनलॉक करून टेबलवर ठेवण्याची ही स्पर्धा असते. ज्याला पहिल्यांदा फोन किंवा मॅसेज येईल तो सर्वांना वाचून दाखवेल. अशी अट या स्पर्धेत असते. याचाच आधार घेत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यातून सगळ्यांची होणारी पोलखोल आणि अनेक गुपित मनोरंजक पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहेत. आता हा चित्रपट ओटीटीवर धमाल दाखवण्यास सज्ज होणार आहे. Khel Khel Mein OTT Release |