मुंबई – हरियाणाची लोकप्रिय गायिका आणि डान्सर “सपना चौधरी’ हिने नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला सपनाने आपला बॉयफ्रेंड वीर साहूसोबत साखरपुडा केला होता, अशी अफवा होती. वीर साहू हा हरियाणाचा प्रसिद्ध गायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार सपना गेल्या चार वर्षांपासून साहूला डेट करत होती.
दरम्यान, सपना चौधरीला आपल्या चाहत्यांची मने कशी जिंकता हे चांगलेच माहिती आहे. हरियाणाची ही नृत्यांगण जेव्हा स्टेजवर नाचते तेव्हा चाहतेही तिच्यासोबत ठेका धरत असतात. तिचा कोणताही डान्स व्हिडिओ येताच तो सोशल मीडियावर व्हायरल होतो. तिचे फॅन्स सुद्धा सपनाच्या डान्स व्हिडिओला तुफान लाईक अँड शेअर करतात.
आपण आई झाल्याची सपना चौधरी ने अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सपनाच्या पतीने मात्र फेसबुक लाईव्हदरम्यान ही गोड बातमी शेअर केली.