शुभमंगल सावधान! पहा वरून-नताशाच्या लग्नाचा अल्बम

मुंबई – कलाविश्वातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरलेला अभिनेता वरुण धवनचा विवाहसोहळा अखेर संपन्न झाला आहे. काल म्हणजेच, 24 जानेवारी रोजी वरूनने आपली गर्लफ्रेंड नताशा दलाल सोबत लग्नाची रेशीम गाठ बांधली.

या शाही विवाहसोहळयासाठी संपूर्ण बॉलिवूड अलिबाग मध्ये दाखल झाले होते. अलीबाग येथील “द मॅन्सन हाउस’ या शानदार रिसॉर्टमध्ये या दोघांनी सात फेरे घेतले. हा सोहळा एक प्रायव्हेट सेरेमनी म्हणून आयोजित करण्यात आला असून यात दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते.

सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असून, अनेकांनी या शाही दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती हा लग्नसोहळा पार पडला. 

या लग्नसोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर असे अनेक दिग्गज सहभागी झाले होते.

डेविड धवन यांनी दोघांच्या लग्नासाठी खास व्यवस्था केली आहे. सुरक्षेसह पाहुण्याच्या प्रायव्हसीचीही कडक सुविधा करण्यात आली आहे. हा विवाह सोहळा  एक प्रायव्हेट सेरेमनी होता. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.