पोलिसांच्या कामगिरीमुळे राज्यात चांगली गुंतवणूक- गृहमंत्री

जगभरात ड्रोन हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. या नवीनच आव्हानाचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करुन कार्यान्वित करण्याची गरज आहे. पोलीस खात्यामध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर कसा करता येईल याचाही विचार करण्याची गरज आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी कायदा आणि  सुव्यवस्था महत्त्वाची आहे. सुव्यवस्था असलेल्या राज्यात आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येते. राज्य पोलीस दल उत्कृष्ट काम करत असल्यामुळे राज्यात चांगली गुंतवणूक होत आहे, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. ते सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत बोलत होते.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here