कोरोना काळात पुण्यातील सरदार पटेल रुग्णालयाबाबत चांगला निर्णय

पुणे – लष्कर परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय हे आता “जनरल’ हॉस्पिटल न राहता, “स्पेशालिटी’ बनले आहे. येथील अतिदक्षता विभागामुळे गंभीर स्वरुपातील रुग्णांचा इलाज करणे शक्य होणार असून, रुग्णालयाच्या नावातही बदल केला जाणार असल्याची माहिती बोर्ड प्रशासनाने दिली आहे.

 

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचा दर्जा वाढला असून, आत हे रुग्णालय स्पेशालिटी आणि क्रिटिकल केअर म्हणून ओळखण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागाबरोबरच इतर विभाग सुरू केल्यामुळे या रुग्णालयाचा दर्जा वाढविण्यात आला आहे. बोर्डाचे हे रूग्णालय गेल्या पाच दशकांहून अधिक काळ पुणेकरांच्या आरोग्यसेवेत आहे. मात्र, याठिकाणी अतिदक्षता विभागाची सोय उपलब्ध नसल्यामुळे या एखादा रुग्ण गंभीर झाला, तर त्याला इतरत्र हलवावे लागत होते.

 

ही बाब लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले अतिदक्षता विभाग करोनाच्या काळात सुरू करण्यात आला. त्यामुळेच बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालय या नावाच्या पुढे स्पेशालिटी आणि क्रिटिकल केअर असे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.