चालू वर्षात आयटी क्षेत्राला चांगले दिवस

नवी दिल्ली – माहिती व तंत्रज्ञानाचा (आयटी) वापर करण्यात येणाऱ्य़ा व्यवसायाला मागील वर्षापेक्षा यंदा अच्छे दिन येणार आहेत. यामध्ये रोजगार निर्मितीचा टक्का वाढणार असून त्यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्य़ांना मिळणाऱ्य़ा वेतनामध्येही वाढ हेणार आहे.

बाजारातील नवीन उभारण्यात आलेल्या मशीन आणि रोबोट्‌सचा प्रत्येक क्षेत्रात वाढत असणारा वापर या कारणामुळेच आयटी क्षेत्रात समाधानकाक बदल होण्याचा अंदाज नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस (नेस्कॉम) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

या वर्षात आयटी उद्योगक्षेत्रात 8 ते 10 टक्के वाढीव वेतन तसेच चांगले काम करणाऱ्या जिनिअसर्नना बढती मिळण्याचे अनुमान नेस्कॉमच्या उपाध्यक्षा संगीता गुप्ता यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार नोंदवले आहे. आर्टिफिशिअल इन्टेलिजेन्स, सायबर सुरक्षा आणि ब्लॉकचेन या क्षेत्रातल्या इंजिनिअर्सना 20 टक्‍क्‍यापर्यंत वेतनवाढ होण्याचे संकेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.