पुणे – करोना या संसर्गजन्य साथीच्या रोगाबाबत पुणेकरांमध्ये चांगलीच जागरूकता वाढल्याचे दिसून येते, अशी माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
अग्रवाल म्हणाल्या की, या पूर्वी नागरिक करोनाबाबत गांभीर्याने विचार करत नव्हते, तर निष्काळजीपणे वागत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा ट्रेंड बदलला आहे.
नागरिक आपल्या स्वतःसह कुटुंबियांची सर्वतोपरी काळजी घेताना दिसतात. याचा परिणाम दिसू लागला आहे.
गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत असल्याबाबत अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले.