लोणी काळभोर – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्कूल फॉर ब्रॉडकास्टिंग ऍण्ड जर्नलिझमच्या पदवी दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आदित्य ग्रोवर याची अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे होणाऱ्या इक्क्वल्सच्या पहिल्या जागतिक युवा गोलमेज परिषदेसाठी तसेच ग्लोबल स्किबिक्स आयएनसीचे प्रतिनिधत्व करण्यासाठी निवड करण्यात आली.
युनिसेफचा एक भाग असलेली ही परिषद दि. 17 ते 23 सप्टेंबर 2019 दरम्यान न्यूयॉर्क येथे होणार आहे. जीएसएमए (युनेस्को), इंटरनॅशनल ट्रेड सेंटर आणि युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी आयटीयूमध्ये सहभागी होणार आहेत. यंदाच्या या पहिल्या परिषदेमध्ये सर्वांना एक शाश्वत भविष्य साध्य करण्यासाठी आवश्यक महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास केला जाणार आहे.