Paris Olympics 2024 (Golf, Women’s Individual) : भारताच्या अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांनी महिलांच्या गोल्फमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. अदिती अशोक आणि दीक्षा डागर महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले गोल्फमध्ये पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या. यासह भारताचे गोल्फमधील आव्हान संपुष्टात आले.
पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या गोल्फ स्पर्धेच्या चौथ्या आणि अखेरच्या फेरीअखेर अदिती अशोक (Aditi Ashok) ही 29 व्या स्थानी तर दीक्षा डागर (Diksha Dagar) 49व्या स्थानी राहिली. महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले गोल्फमध्ये एकूण 60 खेळाडूंनी भाग घेतला होता.
Final Golf results:
Aditi Ashok -29th/60 (score- 290)
Diksha Dagar – 49th/60 (score- 301)#Paris2024 #Golf #Cheer4Bharat #Olympics@mansukhmandviya @MIB_India @PIB_India @IndiaSports @Media_SAI @AkashvaniAIR @DDNewslive @DDNational @DDIndialive @aditigolf @DikshaDagar pic.twitter.com/98F6uQDiyg
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 10, 2024
न्यूझीलंडने पटकावलं सुवर्ण….
या स्पर्धेत न्यूझीलंडच्या लिडिया को (Lydia Ko) हिने पहिल्या स्थानासह सुवर्णपदक जिंकले तर जर्मनीच्या एस्थर हेन्सलीट (Esther Henseleit) हिने दुसऱ्या स्थानासह रौप्यपदक पटकावले. चायनाच्या लिन शियु (Lin Xiyu) हिला तिसऱ्या स्थानासह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
Paris Olympics 2024 (Athletics) : सर्वोत्तम दिले, मात्र दिवस माझा नव्हता – नीरज चोप्रा
भारतीय खेळाडूंचे फेरीनुसार स्थान
चौथी फेरी (अदिती अशोक : 29 वे स्थान, दीक्षा डागर : 49 वे स्थान)
तिसरी फेरी (अदिती अशोक : 40 वे स्थान, दीक्षा डागर : 42 वे स्थान)
दुसरी फेरी (अदिती अशोक : 14 वे स्थान, दीक्षा डागर : 14 वे स्थान)
पहिली फेरी (अदिती अशोक : 13 वे स्थान, दीक्षा डागर : 7 वे स्थान)