नवी दिल्ली – जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतानुसार भारतीय बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली. दिल्ली सराफात ( Gold Price Today ) सोन्याचे दर 39 रुपयांनी वाढून 49,610 रुपये प्रति दहा ग्रम झाले. तयार ( Silver Price Today ) चांदीचा दर दिल्ली सराफात 36 रुपयांनी वाढून 68,156 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,883 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 26.26 डॉलर प्रति औंस झाले.
सोन्याचे दर जास्त प्रमाणात वाढले असते मात्र दरम्यानच्या काळात रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे हे दर मर्यादित प्रमाणात वाढले आहेत, असे एचडीएफसी सेक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, जागतिक बाजारात डॉलर कमकुवत झाला असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले. करोना व्हायरस आणि इतर अडचणी पाहता विविध बाजारात अस्थिरता राहणार आहे. त्यामुळे सोन्याचे दरही अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.