चीनमधील सोन्याच्या खाणीतील आगीत 10 मृत्यूमुखी

बीजिंग – पूर्व चीनच्या शेडोंग प्रांतात सोन्याच्या खाणीला लागलेल्या आगीत सहा जण ठार झाले, तर इतर चार जणांना वाचविण्यात आले, अशी माहिती सरकारी माध्यमांनी बुधवारी दिली. वाचविण्यात आलेल्या चौघांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. झाययुआन शहरातील काझियावा सोन्याच्या खाणीत देखभाल सुरू असताना ही आग लागली, अशी माहिती अधिकृत वृत्तसंस्थेने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली.

शेडोंगमधील या दुर्घटनेत एकूण दहा खाण कामगार अडकले होते. सोन्याच्या खाणीतील आगीची एका महिन्याभरात दुसरी मोठी घटना होती. जानेवारीत हुशान खाणीतील स्फोटामुळे कमीतकमी 10 खाण कामगारांचा मृत्यू झाला होता आणि 11 कामगार दोन आठवड्यांसाठी अडकले होते.

त्यांना आश्‍चर्यकारकरितीने बाहेर काढण्यात आले होते. वारंवार होणाऱ्या खाण दुर्घटनांमुळे अधिकाऱ्यांकडे अधिक सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.