गोल्डन किंग, द बिशप्स चेक, 7 नाईट्‌स विजय

पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धा
पुणे: गोल्डन किंग, द बिशप्स चेक व 7 नाईट्‌स या संघांनी येथे होत असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आपली विजयी मालिका कायम राखली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत तन्मय चितळे, आदित्य भट, सारंग उधवर्षे, शुभांकर मेनन, निखिल चितळे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर 7 नाईट्‌स संघाने वाडेश्वर विझार्डस संघाचा 5-1 असा एकतर्फी पराभव केला.

गोल्डन किंग संघाने गोल्डफिल्ड ट्रायडेंट्‌स संघाचा 4-2असा पराभव करून तिसरा विजय मिळवला. विजयी संघाकडून निरंजन गोडबोले, अजिंक्‍य जोशी, हेमंत उर्धवर्षे, प्रियदर्शन डुंबरे यांनी अफलातून कामगिरी बजावली. तर, अन्य लढतीत द बिशप्स चेक संघाने मराठा वॉरियर्स संघाचा 4-2 असा पराभव करून विजय मिळवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सविस्तर निकाल: राउंड रॉबिन फेरी:
गोल्डफिल्ड ट्रायडेंट्‌स पराभूत वि.गोल्डन किंग 2-4(राजशेखर करमरकर पराभूत वि.निरंजन गोडबोले 0-1; अमोद प्रधान पराभूत वि.अजिंक्‍य जोशी 0-1; पराग चोपडा पराभूत वि.हेमंत उर्धवर्षे 0-1; विजय ओगळे वि.वि.अर्णव कुंटे 1-0; अमृता देवगावकर पराभूत वि.प्रियदर्शन डुंबरे 0-1; ईशान लागू वि.वि.अभिषेक देशपांडे 1-0);
द बिशप्स चेक वि.वि.मराठा वॉरियर्स 4-2(अश्विन त्रिमल वि.वि.आशिष देसाई 1-0; अभिषेक गोडबोले पराभूत वि.परम जालन 0-1; अनघा भिडे पराभूत वि.मिहीर शहा 0-1; केतन देवल वि.वि.अमित धर्मा 1-0; किरण खरे वि.वि.यश मेहेंदळे 1-0; चारू साठे वि.वि.राजेंद्र एरंडे 1-0);

7 नाईट्‌स वि.वि.वाडेश्वर विझार्डस 5-1(तन्मय चितळे वि.वि.अक्षय साठे 1-0; आदित्य भट वि.वि.कुणाल भुरट 1-0; माधुरी जाधव पराभूत वि.अमोल मेहेंदळे 0-1; सारंग उधवर्षे वि.वि.कौस्तुभ वाळिंबे 1-0; शुभांकर मेनन वि.वि.रामकृष्णा मेहेंदळे 1-0; निखिल चितळे वि.वि.रोनीत जोशी 1-0).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)